Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हिंजवडी मेट्रो धावली, पण पुण्यात ५० लाखांचे घर खरेदी करताना मेट्रो टॅक्स किती? पुणेकरांचाही मेट्रो उभारणीत मोठा वाटा !

हिंजवडी मेट्रो धावली, पण पुण्यात ५० लाखांचे घर खरेदी करताना मेट्रो टॅक्स किती? पुणेकरांचाही मेट्रो उभारणीत मोठा वाटा !

पुणे : खरा पंचनामा 

पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिवाजीनगर ते मान-हिंजवडी दरम्यानच्या २३ किमी लांबीच्या पुणे मेट्रो मार्ग ३ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.

बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होईल. दरम्यान वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन मार्ग आधिपासूनच पुणेकरांच्या सेवेत आहे.

पुण्यातील या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्त निधीचा पुरवठा केला आहे. पण या निधी उभारणीमध्ये सामान्य पुणेकरांचेही मोठे योगदान आहे. कारण पुण्यात नवे, घर, जमीन किंवा दुकान खरेदी करताना खरेदीदारांना १ टक्के मेट्रो अधिभार भरावा लागतो. म्हणजेच पुण्यात जर कोणी ५० लाखांचे घर खरेदी करत असेल तर त्याला मेट्रो अधिभार म्हणून ५० हजार रुपये भरावे लागता.

पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत घर खरेदी करताना, एकूण मुद्रांक शुल्काचा दर पुरुष खरेदीदारांसाठी ७ टक्के, महिला खरेदीदारांसाठी ६ टक्के आणि संयुक्त मालकीच्या बाबतीत ६.५ टक्के इतका आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि पूल यांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने, फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे येथे 'मेट्रो उपकर' लागू करण्यात आला होता. पुढे कोरोनामुळे हा कर मार्च २०२२ पर्यंत स्थिगित करण्यात आला होता. तर, १ एप्रिल २०२२ पासून हा पुन्हा लागू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रो मार्ग ३ ला 'पिंक लाईन' असेही म्हटले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी एकूण ८३०० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही 'पिंक लाईन' मान ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकापर्यंत जोडलेली आहे. मेट्रोच्या या मार्गामुळे हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगर यादरम्यान प्रवाशांसाठी प्रवास सुलभ होणार आहे. तसेच यामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास, वाहतूक कोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास, तसेच प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.