काँग्रेसमधील काही नेत्यांमुळेच मोदी जेलमध्ये जाण्यापासून वाचले ! बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ, कोण होते ते नेते ?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोइली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याच पक्षातील काही नेत्यांची त्यांची चौकशी थांबविली होती. ते जेलमध्ये जाऊ शकले नाहीत. त्याचीच किंमत आता चुकवावी लागत असल्याचे मोइली म्हणाले आहेत.
कर्नाटकात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोइली यांनी नुकतेच हे विधान केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी कायदा मंत्री असताना अमित शाह यांना गुजरातमधून बाहेर काढले होते. त्यांचे प्रकरण अन्य राज्यात चालणार होते. जेलमध्ये जाणारे पहिले व्यक्ती तेच होते. त्यानंतर मोदींचा क्रमांक होता. त्यांनाही राज्यातून बाहेर काढले जाते.
मोइली यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांवरच ठपका ठेवताना सांगितले की, पक्षातील च काही दुर्भाग्यपूर्ण घटना होत्या. मोदींविरोधातील चौकशी आपल्याच सरकारने थांबविली होती. असे मनमोहन सिंग (तत्कालीन पंतप्रधान) यांच्यामुळे झाले नव्हते, तर अन्य काही नेत्यांमुळे घडले होते. आज आपण त्याचीच किंमत चुकवत आहोत.
काँग्रेस नेते मोइली यांनी हा दावा करताना कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. आपण या प्रकरणाच्या अधिक खोलात जाऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले. मोइली यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या विधानामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
दरम्यान, मोइली यांनी उल्लेख केलेली घटना ही सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणाची संबंधित आहे. याच प्रकरणाते २०१० मध्ये सीबीआयने अमित शाह यांना अटक केली होती. तेव्हा ते गुजरातचे गृह राज्यमंत्री होते. डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शहांना दोषमुक्त केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.