Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांच्या नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा

फडणवीसांच्या नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा



कोल्हापूर : खरा पंचनामा 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सतेज पाटलांच्या राजकीय वागणुकीवर आणि डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर थेट सवाल उपस्थित करत अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेतला. देवंद्र फडणवीस तेल लावलेला पैलवान आहे, त्यांच्या नादाला लागू नका अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिला.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान असून ते एकदा वटारले तर संपूर्ण साम्राज्य एका दिवसात धुळीस मिळेल, अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाण्याऐवजी राहुल गांधींकडे परवानगी मागण्यासाठी जा, असा खोचक टोलाही पाटलांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील १५ दिवसांपासून कोल्हापुरात जे सुरू आहे ते सर्वजण पाहत आहेत. लहान मुलाला एखादे खेळणे मिळाले नाही की ते जसा त्रागा करते, अगदी तसाच प्रकार सुरू आहे. त्यांच्या या बालिश वागण्यामुळेच लोकांनी ओळखले आहे की हे 'बंटी' आहेत, 'बंटी साहेब' नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर माणूस समजदार असावा लागतो. पण केवळ स्वतःची टिमकी वाजवून मुख्यमंत्री होता येत नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा सतत प्रयत्न केला गेला. पण आज महायुती म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र ठामपणे उभे आहोत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत बंटी पाटील सोडून त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच दिसली नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला. राहुल गांधींना कोल्हापूरबद्दल काय माहिती आहे? गोकुळचे नाव जगात २१२ ठिकाणी पोहोचले आहे आणि ते चांगल्या कामामुळे पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.

डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, एकेकाळी डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे सर्व स्वतःसाठी मलाई काढण्याचे काम चालले आहे. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता, त्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा. आपली उंची पाहून बोला, आम्हाला डिवचले तर आम्ही सोडणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.